शिवसेना भारतीय कामगार संघटनेची भद्रावतीत सिव्हील कामगार, ट्रांसपोर्ट व ऑटो स्टैंड शाखेचे उदघाटन..Inauguration of Civil Workers, Transport and Auto Stand Branch of Shiv Sena Indian Labor Organization in Bhadravati.
शिवसेना भारतीय कामगार संघटनेची भद्रावतीत सिव्हील कामगार, ट्रांसपोर्ट व ऑटो स्टैंड शाखेचे उदघाटन..
चंद्रपुर जिल्हा :- वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांच्या कामगारांना न्याय हक्क मिळवून देवून जास्तीत जास्त सभासद बनविण्याचे निर्देशानुसार भद्रावती तहसील कार्यालयासमोर सिव्हील कामगार यूनियन, कर्नाटक एम्टा ट्रांसपोर्ट यूनियन व भद्रावती बस स्टैंड जवळ ऑटो स्टैंड शाखेचे उदघाटन करण्यात आले.
सदर भद्रावती तहसील कार्यालयासमोर सिव्हील कामगार यूनियन, कर्नाटक एम्टा ट्रांसपोर्ट यूनियन व भद्रावती बस स्टैंड जवळ ऑटो स्टैंड शाखेचे उदघाटन शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांच्या शुभ हस्ते करुन संघटनेसंदर्भात मार्गदर्शन करित उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम यांची उपस्थिती होती, तर शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष दिपक कामतवार, कामगार जिल्हा उपाध्यक्ष बंटीभाऊ हेमके, कामगार भद्रावती तालुका अध्यक्ष योगेश म्यानेवार, कामगार भद्रावती शहर अध्यक्ष विकास मड़ावी, वाहतुक भद्रावती तालुका अध्यक्ष सनी दामोदर, वाहतुक भद्रावती शहर प्रमुख (वाहतुक) बाळू पतरंगे, महिला आघाडी भद्रावती तालुका प्रमुख योगिता घोरुडे, उप तालुका प्रमुख राधा कोल्हे, उपशहर प्रमुख सविता तरारे, मंदाताई धान्दे, विवेक दुर्गे महिला, कामगार व शिवसैनिकांची प्रमुख उपस्थिती होती.
Post a Comment