चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने संसदरत्न खासदार मा. श्रीकांतदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप..On behalf of Chandrapur Shiv Sena, fruits were distributed to patients on the occasion of the birthday of Sansad Ratna MP Hon. Shrikantdada Shinde..
चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने संसदरत्न खासदार मा. श्रीकांतदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप..
चंद्रपुर जिल्हा:- शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र, युवासेनेचे झूंझार नेतृत्व व कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार संसदरत्न मा. श्रीकांतदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथील नेत्रशल्य चिकित्सा कक्षातील रुग्णांना फळवाटप करुन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम, वाहतुक व वैद्यकिय जिल्हाप्रमुख अरविंद धिमान,चंद्रपुर तालुका संघटक संजयकुमार शिंदे, बल्लारपुर विधानसभा महिला संघटिका कृष्णा सुरमवार, शिवसेना योगेश मुरेकर, उपतालुका प्रमुख विक्की महाजन, उपशहर प्रमुख सूचक दखने, उपशहर प्रमुख विश्वास खैरे, भद्रावती माजी नगरसेवक नाना दुर्गे, विवेक दुर्गे, मंगेश वांढरे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
Post a Comment