शिवसेना पक्ष वाढीसाठी उपजिल्हाप्रमुख कमलेश शुक्ला यांचा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात दौरा..Upazila Chief Kamlesh Shukla visits Ballarpur assembly constituency for Shiv Sena party growth

शिवसेना पक्ष वाढीसाठी उपजिल्हाप्रमुख कमलेश शुक्ला यांचा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात दौरा


चंद्रपूर:- शिवसेना पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख मा. किरणजी पांडव यांचे आदेशाने व चंद्रपुर शिवसेना जिल्हाप्रमुख मा. नितीनभाऊ मत्ते यांचे सूचनेनुसार बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री कमलेश जी शुक्ला यांनी विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा व मुल तालुक्यातील क्षेत्राचा दौरा करून मुल तालुकाप्रमुख आकाश कावडे, मुल शहर प्रमुख विशाल नागुलवार व पोंभूर्णा तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार व बल्लारपुर विधानसभा संघटक विनोद चांदेकर, श्री बालाजी सातपूते उपतालुका प्रमुख इटोली यांना पक्ष वाढी संदर्भात विशेष सूचना दिल्या तसेच बूथ प्रतिनिधी, शिवदूत, शाखाप्रमुख यांच्या तात्काळ नियुक्त करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा अशी विनंती सुद्धा केली . 


यावेळी त्यांचे समवेत बल्लारपूर तालुका संघटक सुधीरजी ठाकूर , चंद्रपूर शिवसेना तालुका प्रमुख संतोषभाऊ पारखी, बल्लारपूर शहर प्रमुख मनजीत सिंग, राजूभाऊ रायपुरे, भगवानदास रॉय यांचे समवेत हा दौरा करण्यात आला

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.