शिवसेनेकडून भारताच्या संविधान उद्देशिकांचे वाटप करीत वाढदिवस साजरा..Shiv Sena celebrates birthday by distributing the preambles of the Constitution of India.

शिवसेनेकडून भारताच्या संविधान उद्देशिकांचे वाटप करीत वाढदिवस साजरा..

"शिवशक्ति-भिमशक्ति एकत्र" हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला पोहचेल, हाच उद्देश..

चंद्रपुर जिल्हा :- शिवसेना मुख्यनेते तथा उप-मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष मा. आनंदराजजी आंबेडकर यांनी युती करुन शिवशक्ति-भिमशक्ति एकत्र आली आहे, हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला पोहचावा. याच हेतुने चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने शिवसेना उप-तालुका प्रमुख विक्की महाजन यांचा वाढदिवसानिमित्त भारताच्या संविधान उद्देशिकांचे वाटप करुन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, शिवसेना महिला आघाडी चंद्रपुर जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम, बल्लारपुर विधानसभा प्रमुख क्रिष्णाताई सुरमवार, घुग्घूस शहर प्रमुख महेश ढोंगे, तालुका संघटक संजयजी शिंदे, उप-तालुका प्रमुख विक्की महाजन, अमोल टोंगे, मुक्कदर बावरे, उप-महानगर प्रमुख विश्वास खैरे, सूचक दखने,युवासेना मा. महानगर प्रमुख दिपक रेड्डी, भद्रावती महिला उप-तालुका प्रमुख राधाबाई कोल्हे, मा. नगरसेवक नानाभाऊ दुर्गे, युवासेना उप-शहर प्रमुख विवेक दुर्गे, निखिल सुरमवार व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

शिवसेना मुख्यनेते तथा उप-मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री काळात गेल्या अडीच वर्षांत सामान्य माणूस, गोरगरीब, शोषित आणि वंचितांसाठी विविध योजनेमार्फ़त केलेलं कामांना व सतत सर्वसामान्य नागरिकांबद्दल असलेली तळमळ पाहून तसेच दोन्ही पक्षांची युती ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून चालत आली असून कोणत्याही अटी शर्तीशिवाय ही युती झाली असून आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष मा. आनंदराजजी आंबेडकर यांनी युतीद्वारे शिवशक्ति-भिमशक्ति संदेश दिलेला आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.