दुर्गापूर परिसरात घरातून मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करा.Take immediate action against accused who stole mobile phone from house in Durgapur area.
दुर्गापूर परिसरात घरातून मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करा.
धिरज अशोक दुर्योधन ( तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत उर्जानगर) यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे मागणी
चंद्रपुर जिल्हा :- दुर्गापूर
उर्जानगर कोंडी वार्ड क्र.०५ मधे मागील काही दिवसा पासून घरात शिरून मोबाईल चोरी करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये धक्का बसला आहे..
आत्त्ता 3- 4 दिवसापूर्वी अमोल रामटेक ऊर्जानगर कोंडी वार्ड नंबर 5 यांच्या घरून रात्री मोबाइल फोन चोरी गेला आहे. आणि याच्या अगोदर पण 8 - 9 नागरिकाच्या घरून मोबाइल फोन चोरीला गेले आहे.
खालील प्रमाने चोरी गेलेल्या मोबाईल धारकाचे नावे..नामदेव शिवाजी पवार, अमोल रामटके ,कैलास तामटकर ,हीरालाल बारसगाडे,सोनी रामटेके,सुनील निकाडे , प्रीतम शेंडे , सचिन मुंनेश्वर इत्यादी... या सर्वांचे मोबाईल चोरी गेलेले आहे. पोलिस स्टेशन मधे ब-याच नागरिकांनी तक्रार सुद्धा केली आहे. परंतु आता पर्यंत मोबाईल चोर पकडल्या गेले नाही व मोबाईल चोरी सुरूच आहे.
त्यामुळे गावातल्या नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण चालू झाले असल्यामुळे सदर समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी माजी. ग्रामपंचायत सदस्य संजय गिलबिले, माजी. तंटामुक्ती अध्यक्ष नामन पवार ,
धिरज अशोक दुर्योधन (तंटामुक्ती अध्यक्ष, ग्राम पंचायत उर्जानगर) , आणि सामाजिक कार्यकर्ता संदीप बिसेन, व शैलीका सागवरे, प्रीतम शेंडे, मनोज शेंडे, आशिष रामटेके, धम्मशिल गणवीर, सचिन मुनेश्वर, सोनी रामटेके, सुनील निकोडे यांनी दुर्गापूर पोलीस ठाणेदार अनिल जित्तावार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली...
Post a Comment