केंद्रीय गृह विभागाच्या सहकार्याने अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा:- चंद्रपुर शिवसेनेची मागणी Take strict action against those involved in illegal businesses with the cooperation of the Central Home Department: Chandrapur Shiv Sena demands

केंद्रीय गृह विभागाच्या सहकार्याने अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा:- चंद्रपुर शिवसेनेची मागणी !

पालकमंत्री डॉ. उइके यांचे निर्देश असतांना देखील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात प्रशासन अपयशी

चंद्रपूर जिल्हा :- जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. अशोकजी उइके यांनी अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाला देवून देखील जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे केंद्रीय गृह विभागाकडून सहकार्य घेवून अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी शिवसेना महिला आघाडी चंद्रपुर जिल्हाध्यक्ष मिनलताई आत्राम, तालुका संघटक संजय शिंदे, उप महानगर प्रमुख विश्वास खैरे, योगेश मुऱ्हेकर, भिवराज सोनी, वकील रवी धवन, नगरसेवक नाना दुर्गे, सरफ़राज़ शेख आदींची उपस्थिती होती.

मागील एक ते दीड वर्षापासून जिल्ह्यात अचानकच गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. मागील काही दिवसापासून गुन्हेगार सर्रास कायदा हातात घेत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण असून सर्वत्र कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवणाऱ्या विभागावरच प्रशचिन्ह उभे राहिले आहे? जिल्ह्यात पोलिसच सुरक्षित नसेल व कालच एका राजकीय पदाधिकारी यांच्या घरावर गोळीबार होत असेल, तर सर्वसामान्य जनता स्वतःला कशी सुरक्षित समजेल!मागील काही महिन्यांच्या घडामोडीवर लक्ष टाकले तर जिल्ह्यात पोलीस विभाग कार्यरत आहे कि नाही असेच चित्र सर्वत्र पाहायला मिळते. जिल्ह्यात सर्वत्र अवैद्य धंद्यांना पूर आला असून प्रत्येक चौकात मटका-जुगार व्यवसाय, अवैद्य दारू, सुगंधित तंबाखू, अमली पदार्थ, क्रिकेटचा जुगार, कोंबडा बाजार, अवैध रेती तस्करी, अवैद्य सावकारी व गुन्हेगारीला खत पाणी देणारे सर्वच अवैद्य व्यवसायांचा महापूर आला असून अवैद्य मार्गाने कोळसा चोरी, खनिज संपदा सारख्या व्यवसायातून कमी वेळात श्रीमंत होण्याच्या हवासापोटी जिल्ह्यात रोजच सर्रासपणे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. मर्डर, गँगवार, चोरी चकारीचे असे भयानक प्रकार झपाट्याने वाढले जात आहे. या अवैध धंद्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र गुंडाचा हैदोस माजला असून या गुंडाना पुलिस प्रशासनाचा कुठेही धाकच राहिला नाही. हे अवैध धंदे करणारे गुन्हेगार पोलीस प्रशासनाच्या नाकावर निंबू पिळून सर्रास गुन्हे करत सर्वत्र दहशत पसरवित असून पोलीस प्रशासन मात्र कुंभकर्णी निद्रेत आहे.
 
दुर्गापुर, राजुरा मर्डर केसमधून पोलीस प्रशासनाने कुठलाही बोध घेतल्यामुळे थोड्याच दिवसात दिवसा ढवळ्या हाजी मर्डर होते, ते प्रकरण शांत होण्याआधी बल्लारपूर मध्ये मर्डर होतो. थोडे दिवस गेले की, सर्वासमोर दिवसा ढवल्या मार्केट लाईनमध्ये दुकान पेटविल्या जाते ते विझत नाही तर पोलिसांच्या खाकीवर वार केल्यानंतर एका राजकीय पदाधिकारी याच्या घरावर गोळीबार म्हणजे आता गुन्हेगारांना खाकीची कुठलीच भीती राहिलेली नाही. आज गुन्हेगारी व गुन्हेगारांची हिम्मत एवढी वाढून गेलेली आहे कि, ते पोलिसांच्या अंगावर हात टाकायला सुद्धा घाबरत नाही. याचा अर्थ जिल्ह्यात पोलिसांची वचक राहिलेली नसुन पोलीस फक्त गाड्यांचे चालन फाडण्यापुरते, सर्वसामान्य जनतेला घाबरविण्यापुरते मर्यादित झालेले आहे. पण सर्रास गुन्हेगारांपुढे याची बोबडी बंद होते व त्याच्या समोर यांचे काही एक चालत नाही.

 आज जिल्ह्यात ज्याठिकाणी पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनच्या पाचशे मीटरमध्ये सर्वच प्रकारचे अवैद्य व्यवसाय चालतात. पण एकही पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी बंद करू शकत नाही. वाहतूक शाखेतील कर्मचारी याच्या डोळ्यादेखत अवैध वाहतूक चालते, पण त्यांना थांबवायचे सोडून हा दुचाकील्या रोखण्यात स्वतःच मोठेपणा समजतो. गुन्हेगारांना आळा घालायचे सोडून नवरा बायकोचे, शेजाऱ्या पाजऱ्यांचे भांडणे सोडविण्यात यांना जास्त इंट्रेस्ट वाटतो. मागील एक दीड वर्षात अचानकच अशी कशी या जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली हा अभ्यासाचा विषय असून कुणाच्या कृपादृष्टीने हे गुन्हेगार एवढे मोठे मोठे अपराध करत आहे, यांचा वाली कोण? या वाल्मिकीला कोण यांना शह देत आहे? व पोलीस प्रशासन काय करत आहे! हे शोधणे फार गरजेचे आहे. जिल्ह्यात महसूल विभाग, पोलीस विभाग, पर्यावरण विभाग, वन विभाग, खनिज विभाग सर्वच विभागाचे मुख्य कार्यालय व संबंधित विभागाचे अधीक्षक असून सुद्धा जर रेती, कोळसा, खनिज, लाकूड अश्या शासकीय संपत्ती ची सर्रास तस्करी सुरु असेल तर शासन व प्रशासन झोपा काढत आहे असेच समजावे लागेल किंवा या वाढत्या गुन्हेगारीला व तस्करीला प्रशासनातील मोठे अधिकाऱ्यांचा कुठे ना कुठे सहकार्य असेल!


प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याशिवाय गुन्हेगार गुन्हे करूच शकत नाही? याचाच फायदा घेऊन अवैध धंदे करणारे बिन्धास्त अपराध करत आहे.

पण या सर्व घडामोडीमुळे सर्वसामान्य जनता पूर्णता वैतागलेली असून जनतेमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे. वेळेत या सर्व अपराधीक स्थितीवर आळा घातला नाही, तर चंद्रपूरचे मिर्झापूर व वासेपूर, बिहार व्हायला वेळ लागणार नाही? त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आपणास कळविण्यात येते की, लवकरात लवकर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था टिकविण्याकरिता जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता जिल्हा प्रशासनाने केंद्रीय गृह विभागाकडून सहकार्य घेवून जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यात योग्य ते पाऊल उचलावे अन्यथा शिवसेना स्टाइलने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात लगाम लावण्यासंदर्भात मोठे जनआंदोलन पुकारण्यात येईल व याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा देण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.