लोकसभा निकालानंतर सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यास कलम 149 जा.फौ. नुसार नोटिसा.. After the Lok Sabha result, Article 149 has been issued to all political party office bearers to follow the model code of conduct. Notices as per..

लोकसभा निकालानंतर सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यास कलम 149 जा.फौ. नुसार नोटिसा.. 

चंद्रपुर जिल्हा :- उद्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या निकालानंतर विजयी जल्लोष करतांना सुद्धा आदर्श आचारसंहिता अंमलात असल्याने सोशल मिडीयाव्दारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाटसअप ग्रुप व इतर सोशल मिडीयाच्या माध्यमाव्दारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या व धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता व परवानगी घेण्यासंदर्भात सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दुर्गापुर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाडीवे व रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल गाडे यांनी आज दि. 03 जून 2024 रोज मंगळवारला आपल्या कार्यालयात सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची सभा घेवून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याची विनंती करुन कलम 149 जा.फौ. नुसार नोटिस पदाधिकाऱ्यांना बजावुन ताकीद देण्यात आली.

यावेळी शिवसेनेच्या वतीने प्रतिनिधी म्हणून शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, शिवसेना चंद्रपुर महानगर प्रमुख भरत गुप्ता व शिवसेना वैद्यकीय जिल्हा प्रमुख तथा वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांना बोलावण्यात आले असता सर्वच राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती.

तसेच सोशल मिडीयाव्दारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या व धर्माच्या भावणा दुखावल्या जातील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंटस, स्टोरी स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाव्दारे करू नयेत तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डि.जे. वाजवणार नाहीत व फटाके फोडणार नाहीत आणि विनापरवाना विजयी मिरवणुक काढु नये. जर व्हाटसअप ग्रुपचे एडमिन असल्यास दि. ०३/०६/२०२४ ते दि. ०६/०६/२०२४ पर्यंत या कालावधीमध्ये ग्रुपच्या सेटिंग मध्ये ONLY ADMIN करून बदल करून घेणे, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत. जर एडमिन असलेल्या ग्रुप वर सेटिंगमध्ये बदल न केल्यास एखाद्या सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणा-या सदस्यासह ग्रुप एडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच आपण कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलीस विभागास सहकार्य करावे. असे नोटिसद्वारे बजावण्यात आले.

त्याचप्रमाणे विजयी जल्लोष करण्यास कायदेशीर परवानगी घेवून कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तीक टिका टिप्पणी न करणे, लावण्यात येणारे बॅनर, शुभेच्छा फलकाची संरक्षणाची जबाबदारी त्या व्यक्तिची राहिल, कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम घेवुन अडथळा निर्माण होवून किंवा बॅनर, फलक यांची विटबंना होउन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार धरून योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश नोटिसात नमूद आहेत.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.