शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. मिनल आत्राम व पदाधिकाऱ्यांनी मंगलमय वातावरणात रक्षाबंधन सोहळा साजरा..शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांना औक्षण करित बांधल्या राख्या..Shiv Sena tied rakhis to the District President of the Indian Workers Union and Chandrapur Taluka Chief Santosh Parkhi..!

शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. मिनल आत्राम व पदाधिकाऱ्यांनी मंगलमय वातावरणात रक्षाबंधन सोहळा साजरा..

शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांना औक्षण करित बांधल्या राख्या..!

चंद्रपुर जिल्हा: - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांनी राज्याच्या विकासात महिलांचे मोठं योगदान असल्याने त्यांना आधार देवून बहिणींच्या संसाराला थोडाफार आर्थिक हातभार लागेल, ह्या भावनेतून बहिणीने ओवाळणी न समजता कायमचा माहेरचा आहेर म्हणून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापुर्वी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतील दोन हप्ते जमा करण्याचा निर्धार पूर्ण केल्यामुळे शिवसेना महिला आघाडी चंद्रपुर जिल्हाप्रमुख सौ. मिनल आत्राम व महिला पदाधिकाऱ्यांनी आज दि. 20 ऑगस्ट 2024 रोज मंगळवार ला सायं. 4:00 वाजता सा. बां. विभागाच्या VIP विश्राम गृह येथे शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांना औक्षण करीत राख्या बांधून पक्ष संघटन मजबूत करण्याचा संकल्प करीत महिलांचे पक्ष प्रवेश व नियुक्त्या करुन रक्षाबंधन सोहळा मंगलमय वातावरणात साजरा केला.
Shiv Sena tied rakhis to the District President of the Indian Workers Union and Chandrapur Taluka Chief Santosh Parkhi..!




यावेळी शिवसेना चंद्रपुर तालुका संघटक संजय शिंदे, वैद्यकीय जिल्हाप्रमुख तथा कामगार जिल्हा उपाध्यक्ष दीपक कामतवार, युवासेना चंद्रपुर महानगर प्रमुख दिपक रेड्डी, घुग्घूस शहर प्रमुख महेश डोंगे, चंद्रपुर उप महानगर प्रमुख विश्वास खैरे, भद्रावती नगरसेवक नाना दुर्गे, महिला आघाडी चंद्रपुर तालुका प्रमुख कृष्णाताई सुरमावार,भद्रावती तालुका प्रमुख योगिताताई घोरुडे, मूल तालुका प्रमुख भारतीताई राखुंडे, बल्लारपुर तालुका प्रमुख शालूताई कन्नाके, पोंभूर्णा तालुका प्रमुख वंदनाताई टेकाम, भद्रावती उप-तालुका राधाबाई कोल्हे, भद्रावती उपनगर प्रमुख मंगलाताई आसुटकर, मंदाताई धान्डे, सविताताई तुरारे, सुनंदाताई खारकर, शालूताई बुच्चे, वंदनाताई कुंदावार, पूजाताई खोबरे, विद्याताई तिमजे महिला शिवसैनिकांची प्रामुख्याने उपस्थित होती.

त्याचप्रमाणे शिवसेना महिला आघाडीच्या वरोरा तालुका प्रमुखपदी सौ. अल्का योगेश पचारे यांची नियुक्ति करीत जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील महिलांचा पक्ष प्रवेश करुन रक्षाबंधनात जमा झालेली ओवाळणी दवाखाण्यात उपचार घेत असलेल्या निता सुधाकर शेडमाके यांना वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत म्हणून देण्यात आली.

जिल्ह्यातील बहिणींनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाच्या असेच पाठिशी राहून सरकारची ताकद वाढवावी, जेणे करून या योजनेतील निधी वाढेल आणि या योजनेला बदनाम करणारे, फसवी योजना म्हणणाऱ्यांवर विश्वास न ठेवता महिला व मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी, लखपती दिदी या योजनांचा देखील लाभ घेत विरोधकांना चपराक देण्याचा संकल्प घेण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.