खाजगी ई-ऑटो व वाहनांवर कारवाई न करता महिला बचत गटांच्या ई-ऑटोवर कार्यवाही करणे तात्काळ थांबवाWomen's savings group does not take action on private e-autos and vehicles; immediately stop action on e-autos

खाजगी ई-ऑटो व वाहनांवर कारवाई न करता महिला बचत गटांच्या ई-ऑटोवर कार्यवाही करणे तात्काळ थांबवा

शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांची निवेदनाद्वारे मागणी


 चंद्रपुर :-येथील खाजगी ई-ऑटो व इतर वाहनांवर कुठलीही कार्यवाही न करता, उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून फक्त महिला बचत गटांच्या ई-ऑटोवर कार्यवाही करणे अन्यायकारक असून तात्काळ थांबविण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांना करतांना यावेळेस शिवसेना उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला, वैद्यकीय जिल्हा प्रमुख अरविंद धिमान, उपतालुका प्रमुख अविनाश ऊके, उपतालुका प्रमुख सुरेश खापर्डे, उपतालुका प्रमुख बंडू पहानपाटे व राजू रायपुरे यांची उपस्थिती होती...

        केंद्र शासनाच्या ई-वाहन चालना देणारा महत्वकांक्षी प्रकल्प महिला बचत गटांनी ई-ऑटो चालवून जनतेमध्ये जन जागृती करून, प्रदूषण मुक्त  व पर्यावरण वाचवण्याच्या  उद्देशाने  ई-ऑटो चालवीत आहे. चंद्रपूरात ई-ऑटो मालवाहक लोडर इत्यादी वाहने व अपंगांना पालकमंत्री यांनी ई ऑटो वाटप केलेले आहे.

               चंद्रपुरातील खाजगी ई-ऑटो व इतर वाहने असून त्यांच्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कुठलीही कारवाई न करता  फक्त महिला बचत गटाच्या ई ऑटोवर कारवाई करणे सुरू आहे, असे महिला बचत गटाचे म्हणणे आहे. जेव्हा की, नियम हा सर्वांसाठी सारखा असतो. त्यामुळे आपण आपल्या विभागाकडून फक्त महिला बचत गटांच्या ई-ऑटोवर कार्यवाही करणे तात्काळ थांबविण्यात यावी.

         अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.





कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.