दैनिक नवराष्ट्र निर्माण वृत्तपत्राच्या चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधीपदी संतोष पारखी यांची नियुक्ती.Santosh Parkhi appointed as Chandrapur District Representative of Dainik Navrashtra Nirman Newspaper.

दैनिक नवराष्ट्र निर्माण वृत्तपत्राच्या चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधीपदी संतोष पारखी यांची नियुक्ती..

चंद्रपुर   जिल्हा :- नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या सूचना व प्रसार मंत्रालयातील प्रेस रजिस्ट्रार कार्यालयामध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी दैनिक नवराष्ट्र निर्माण वृत्तपत्राची यशस्वीरित्या नोंदणीकृत केल्यानंतर महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये दैनिक नवराष्ट्र निर्माण वृत्तपत्र नियमित प्रकाशित करुन भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित करण्याचे ध्येय बाळगुण असलेले दैनिक नवराष्ट्र निर्माणचे संपादक दबिरुद्दिन एस. ख्वाजा यांनी चंद्रपुर जिल्ह्याची धुरा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे माजी प्रतिनिधी संतोष दशरथ पारखी यांचे सामाजिक कार्य, पत्रकारिता विषयी आपली आवळ व उत्सुकता पाहता भारतातील नामांकीत व पत्रकारितेची परंपरा जोपासणाऱ्या दैनिक नवराष्ट्र निर्माण वृत्तपत्राच्या चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली.

तसेच संतोष पारखी हे दैनिक नवराष्ट्र निर्माण वृत्तपत्राच्या चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधीची जबाबदारी संविधान, कायदे, समाज, पत्रकारिता तसेच दैनिक नवराष्ट्र निर्माण च्या नियमांशी प्रमाणिक राहून पार पाडतील, यात शंका नाही. त्यांच्या नियुक्तिबद्दल सर्वत्र त्यांना अभिनंदन करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.