ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी संतोष पारखी यांची फेरनिवड..Santosh Parkhi re-elected as Chandrapur District President of Consumer Protection Committee.

ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या  चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी संतोष पारखी यांची फेरनिवड..

चंद्रपुर जिल्हा  :- भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीच अध्यक्ष मा. श्री. दादाभाऊ केदारे व राष्ट्रीय सचिव मा. डॉ. अविनाशजी झोटिंग यांनी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष दशरथ पारखी यांची ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या  चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करुन फेरनिवड करण्यात आली.







संपूर्ण भारतात ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती कार्यरत असून ग्राहक संरक्षण कल्याण हक्क कायदा १९८६/२०१९ अंतर्गत चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील क्षेत्रात काम करण्यासाठी संतोष पारखी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राहक घटकांबद्दल असलेली माहिती, कायदेशीर ज्ञान, सामाजिक कार्य आणि स्वेच्छा लक्षात घेवून सर्व अधिकाऱ्यांच्या संमतीने चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी श्री. संतोष दशरथ पारखी यांची दि. ३१दिसेंबर २०२६ पर्यंत नियुक्ती करण्यात आलेली आहे.
संतोष पारखी



"जागो ग्राहक जागो" तुम्ही या नावाला चंद्रपुर जिल्हा, तहसील, वॉर्ड आणि गाव पातळीवर शाखा उघडण्यासाठी स्वेच्छेने काम करणाऱ्या जाणकार आणि कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा अधिकार देण्यात आले असून ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीमार्फ़त प्रशिक्षण आणि शिबिरांद्वारे जिल्हाध्यक्ष यांना सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी, सहकारी क्षेत्रात करावयाच्या कायदेशीर कामांची माहिती देखील दिली जाईल. तसेच ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांची आणि अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष पारखी यांना राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. दादाभाऊ केदारे यांनी सुचना देवून नियुक्तिबद्दल अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.