पोंभूर्णा तालुक्यातुन चालते रोज रात्री अवैध वाळू तस्करी.. शिवसेनेची कठोर कार्यवाही करण्याची मागणी..Illegal sand smuggling is going on every night from Pombhurna taluk..Shiv Sena demands strict action..
▪️पोंभूर्णा तालुक्यातुन चालते रोज रात्री अवैध वाळू तस्करी
▪️शिवसेनेचे तहसीलदार आणि ठाणेदार यांना निवेदन
▪️कठोर कार्यवाही करण्याची मागणी.
चंद्रपूर जिल्हा :-
पोंभूर्णा /२८ नोव्हेंबर.
तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या होत आहे वाळूची तस्करी होत आहे.महसूल व पोलीस प्रशासनाचे या अवैध वाळू तस्करीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.पोंभूर्णा तालुक्यातील भिमणी,कवठी,चेक खापरी, वेळवा,इत्यादी ठिकाणाहून पोंभुर्णा शहरातुन डोंगरहळदी,या मार्गाने राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू आहे.स्थानिक महसूल प्रशासनाचे आणि पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने पोंभुर्णा तालुका शिवसेनेने या अवैध प्रकाराकडे निवेदनातून लक्ष वेधले आहे.
पोंभूर्णा तालुक्यात चालु वर्षात कोणताही घाट लिलाव झालेला नाही,त्यामुळे वाळू कुठून येत आहे असा प्रश्न उपस्थित होतो. ही वाळू तस्करी गोंडपिपरी व पोंभुर्णा तालुक्यातील काही विशिष्ट घाटामधून रात्रीच्या सुमारास उपसा करून पोंभूर्णा ते चंद्रपूर अशी सुरू आहे.ही अवैध वाळू वाहतूक रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत प्रशासनाच्या नजरेत धूळ टाकत सुरू असल्याचे बोलले जात असले तरी महसूल व रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलीस प्रशासनाला याची माहीती नसावी?याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.भरधाव वेगाने या वाळूच्या हायवा ट्रक चालू असल्याने या मार्गाने प्रवास करतांना अप्रत्यक्ष रित्या सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही..
तसेच रात्रभर अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याने चेक खापरी व कवठी रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्या रोडवर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही वाहतूक रात्री बारा वाजता नंतर पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत खुलेआम केली जात आहे.त्यामुळे या होणाऱ्या अवैध वाळू तस्करी वाहतुकीवर निर्बंध घालून तस्करांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार व ठाणेदार यांना देण्यात आले.कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन केल्या जाणार असल्याचा सज्जड इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार,विधानसभा प्रमुख
विनोद चांदेकर,शहर प्रमुख संतोष पार्लेवार,तालुका संघटक सचिन मडावी,उपतालुकप्रमुख नंदकिशोर पोतराजे,तालुका समन्वयक व्यंकटेश चिपावार, जिवनदास गेडाम,सतीश बावने,जयदेव मडावी, लिलाराम कष्टी,दौलत देवगडे,वेदप्रकाश आगरकर,बंडु तलांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment