ब्रह्मपुरी विधानसभेतील सिंदेवाही तालुक्यांमध्ये भव्य पक्षप्रवेश व सत्कार सोहळा कार्यक्रम..Grand party induction and felicitation program in Sindewahi talukas of Brahmapuri assembly
ब्रह्मपुरी विधानसभेतील सिंदेवाही तालुक्यांमध्ये भव्य पक्षप्रवेश व सत्कार सोहळा कार्यक्रम..
चंद्रपूर जिल्हा :- महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदे साहेब, शिवसेना सचिव संजयजी मोरे साहेब,पूर्व विदर्भ संघटक किरणभाऊ पांडव यांच्या आदेशाने व शिवसेना चंद्रपुर संपर्क प्रमुख गंगाधरजी बडूरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख तथा चंद्रपुर जिल्हा नियोजन समिती, सदस्य बंडूभाऊ हजारे यांनी आज दि. 11 फेब्रुवारी 2024 रोज रविवारला सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे शिवसेना पक्षप्रवेश व शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी संतोष पारखी यांचा व वाहतूक संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी अरविंद धिमान यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच भव्य शिवसेना पक्षप्रवेशासोबत ब्रह्मपुरी विधानसभेतील सिंदेवाही तालुका प्रमुखपदी जालिंदर गायकवाड़ यांची नियुक्ति करण्यात आली. तर सिंदेवाही तालुका संघटकपदी नेताजी गहाणे यांची नियुक्ति करुन शिवसेना पक्ष संघटना बळकट करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले.
Post a Comment