अल्कोहोलिक्स् अँनॉनिमस् (ए.ए.) समृद्ध समूहाचा 2 रा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.Alcoholics Anonymous (AA) celebrated its 2nd anniversary with great enthusiasm.

अल्कोहोलिक्स् अँनॉनिमस् (ए.ए.) समृद्ध समूहाचा 2 रा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

चंद्रपुर  जिल्हा:- येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उर्जानगर कोंडी येथे आज दि. 27 एप्रिल 2024 रोज शनिवारला सांय. 7:00 वा. अल्कोहोलिक्स् अँनॉनिमस् समृद्ध समूह, दुर्गापुरचा 2 रा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषभाऊ पारखी व दुर्गापुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक लताताई वाढीवे मैडम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अल्कोहोलिक्स् अॅनॉनिमस् म्हणजे अनामिक मद्यपी, ही पुरूष व स्त्रियांची एक संघटना आहे. ह्यामधील सभासद आपले व्यक्तिगत अनुभव एकमेकांना सांगतात ज्यामुळे सर्व सभासदांचे मानसिक धैर्य वाढते व नवजीवनाची आशा निर्माण होते.

अशा तन्हेने सभासद आपले स्वतःचे तसेच एकमेकांचे प्रश्न सोडवतात आणि दारूपासून दुर राहतात. या संघटनेत सामील होण्यास फक्त एकच अट आहे की, दारूच्या रोगातुन मुक्त होण्याची सभासदाची इच्छा असली पाहीजे. ए.ए. च्या सभासदत्वासाठी कसलीही वर्गणी किंवा देणगी आकारली जात नाही.

ए. ए. या संघटनेचे ध्येय एकच आहे की, मद्यापासून स्वतःला दुर ठेवणे आणि ज्यांना दारूपासून मुक्ती मिळवण्याची इच्छा आहे अशा इतर मद्यपिडीत लोकांना मदत करणे. सदर कार्यक्रम समृद्ध समूह, दुर्गापुर मागील दोन वर्षापासून यशस्वीरित्या पार पाड़त असल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषभाऊ पारखी व दुर्गापुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक लताताई वाढीवे मैडम यांनी प्रशंसा करुन सहकार्य करण्याचे बोलून दाखवले.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.