शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या वरोरा तालुका अध्यक्षपदी अजय राखूंडे यांची नियुक्ती.Shiv Sena appoints Ajay Rakhunde as Varora Taluka President of Indian Workers' Union.

शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या वरोरा तालुका अध्यक्षपदी अजय राखूंडे यांची नियुक्ती.

कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व वाहतुक संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांच्या हस्ते नियुक्ति पत्र.

चंद्रपुर  जिल्हा:- वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांच्या आदेशानुसार शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी चंद्रपुर येथे आज दि. 26 अप्रैल 2024 रोज शुक्रवारला चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे इथे कामगार वर्ग फार मोठ्या प्रमाणात समस्या असल्याने शिवसेना भारतीय कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मा. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांनी कामगार संघटनेचा विस्तार करण्याच्या आदेशानुसार वरोरा तालुका अध्यक्षपदी अजय राखूंडे यांची नियुक्ति करुन कामगारांच्या समस्या जलद गतीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना महाराष्ट्र अध्यक्ष मा. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांनी देवून नियुक्तीबद्दल अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सदर नियुक्ति करताना शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे वाहतुक संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान व शिवसेना ऊर्जानगर विभाग प्रमुख मुक्कुदरसिंग बावरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.