चंद्रपुर जिल्ह्यातील शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या कामगार व वाहतुक संघटनेच्या विविधपदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.Appointment of various post office bearers of Shiv Sena Bharatiya Labor Association Labor and Transport Association in Chandrapur district

चंद्रपुर जिल्ह्यातील शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या कामगार व वाहतुक संघटनेच्या विविधपदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.

कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व वाहतुक संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांच्या हस्ते नियुक्ति पत्र वाटप.

चंद्रपुर  जिल्हा:- वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मणभाई जनार्दन तांडेल यांच्या आदेशानुसार शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी चंद्रपुर येथे आज दि. 25 अप्रैल 2024 रोज गुरुवारला दु. 12 वा. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे इथे कामगार वर्ग व वाहतूकीची फार मोठ्या प्रमाणात समस्या असल्याने शिवसेना भारतीय कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांनी कामगार संघटनेचा विस्तार करण्याच्या आदेशानुसार कामगार संघटनेच्या भद्रावती तालुका अध्यक्षपदी योगेश म्यानेवार यांची नियुक्ती करण्यात आली.

तसेच शिवसेना भारतीय वाहतुक संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांनी वाहतुक संघटनेच्या चंद्रपुर महानगर अध्यक्षपदी निलेश गुजर यांची नियुक्ति करुन सर्व मिळून वाहतुक व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी अथक परिश्रम करून प्रयत्न करण्याच्या सुचना महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांनी देवून नियुक्तीबद्दल अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

सदर शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या कार्यक्रमाला शिवसेना शिवसेना महिला आघाडी चंद्रपुर जिल्हा प्रमुख (बल्लारपुर, चिमूर व वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र) मिनलताई आत्राम, भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष दिपक कामतवार, जिल्हा उपाध्यक्ष अश्विन हेमके, चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष (वाहतुक) चंद्रपुर तालुका अध्यक्ष(वाहतुक) सुरेश खापर्डे, चंद्रपुर तालुका उपाध्यक्ष (वाहतुक) विश्वास शेंडे, भद्रावती शिवसेना महिला आघाडी तालुका संघटक योगिता घोरुड़े, भद्रावती नगरसेवक नानाभाऊ दुर्गे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.