लोकसभा निवडणुकीत सुधीरभाऊ मुनगंटीवार विजयी झाल्यास सर्वांगीण विकास होईल!शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची मतदारांना ग्वाही. Lokank Sudhirbhau Mungantiwar will win all-round development! Chandrapur Taluka Chief Santosh Parkhi testifies to the candidates!
लोकसभा निवडणुकीत सुधीरभाऊ मुनगंटीवार विजयी झाल्यास सर्वांगीण विकास होईल!
शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची मतदारांना ग्वाही!
चंद्रपुर जिल्हा :- शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेबांची चंद्रपुर येथील मोरवा जाहीर सभेतील भाषणात चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे शिवसेना, भाजपा, रा.कां. (अजित पवार गट), रि.पा.ई. (आठवले गट ), पी.रि.पा.(कवाड़े गट ) व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना विजयी करण्यासाठी शिवसेनेच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करुन विजयी करण्याच्या आदेशाचे पालन करीत चंद्रपुर तालुक्यामधील उर्जानगर, दुर्गापुर, वरवट, चोरगांव, अड़ेगाव, आगरझरी, देवाडा, मोहर्ली, समतानगर, दाताळा, कोसारा या गावी प्रत्यक्ष भेटी देवून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करुन सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची आपणास का आवश्यकता आहे? हे पटवून देण्यात आले.
तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे विजयी झाल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, अशी ग्वाही मतदात्यांना देवून उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे 19 अप्रैल 2024 ला सकाळी लवकरात लवकर मतदान करण्याची विनंती केली.
Post a Comment