उर्जानगरात रामनवमी निमित्त महाआरती पूजन व महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात साजरा..Mahaarti Pujan and Mahaprasad program celebrated with enthusiasm on the occasion of Ram Navami in Urjanagar..
उर्जानगरात रामनवमी निमित्त महाआरती पूजन व महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात साजरा..!
चंद्रपुर जिल्हा:- येथील उर्जानगर (कोंडी) वार्ड नं.5, पोलिस स्टेशन, दुर्गापुर समोर रामनवमी निमित्त महाआरती पूजन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला उर्जानगर व दुर्गापुर परिसरातील सर्वपक्षीय नेते मंडळी, शेकड़ो रामभक्त व नागरिकांनी सहभाग घेवून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
याप्रसंगी रामपालभैया सिंग, भोयर महाराज, संतोषभाऊ पारखी, नामदेवभाऊ आसुटकर, नंदुभासा मोंढ़े, श्रीनिवास जंगम, नागेश कडुकर, भारत रायपुरे, नामन पवार, पुरुषोत्तम बावणे आणि वार्डातील सर्व रामभक्त युवा, महिला व बाल गोपालांनी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
जय श्री राम...
Post a Comment