शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यास पुढाकार घ्यावा..All the district office bearers of Shiv Sena Indian Labor Organization should take the initiative to bring justice to the workers.
शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्यास पुढाकार घ्यावा..
भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांचे चंद्रपुर जिल्हा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश!
चंद्रपुर जिल्हा :- वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांनी कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासंदर्भातील निर्देशानुसार आज दि. 29 एप्रिल 2024 रोज सोमवारला दु. 12 वा. चंद्रपुर येथे जिल्हा पदाधिकारी यांची बैठक घेवून जास्तीत जास्त सभासद बनविणे व कामगारांच्या समस्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील औद्योगिक जिल्हा असल्यामुळे येथे कामगार व वाहतुक कामगार वर्ग फार मोठ्या प्रमाणात असून यामध्ये कामगारांची कंपनी व प्रशासनाच्या संगमताने पिळवणुक करुन शोषण केले जात असल्याचे वारंवार निदर्शात येत असल्याने शिवसेना भारतीय कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मा. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगार संघटनेचा विस्तार करुन सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेवून तात्काळ कामगारांच्या समस्या जलद गतीने सोडविण्याकरीता कटीबद्ध राहण्याच्या निर्देश दिले.
सदर बैठकीला उपस्थित पदाधिकारी व सर्व जिल्हा पदाधिकारी यांना शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांनी महाराष्ट्र अध्यक्ष मा. तांडेल साहेबांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करुन यूनियन, शाखा फलक व सभासद नोंदणीचे कामाला जोमाने लागण्याच्या सुचना केल्या. यावेळी कामगार जिल्हा उपाध्यक्ष दिपक कामतवार, वाहतुक जिल्हा उपाध्यक्ष भारतभूषण झाडे, तालुका अध्यक्ष सुरेश खापर्डे, महानगर अध्यक्ष निलेश गुजर, विभाग प्रमुख विक्की महाजन, मंगेश वांढरे हजर होते.
Post a Comment