उर्जानगर जि. प.शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा ..Urjanagar District Maharashtra Day and Labor Day are celebrated in school with great enthusiasm
उर्जानगर जि. प.शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा ..
चंद्रपुर जिल्हा:- येथील जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, उर्जानगर ( कोंडी ) येथे आज दि.01 मे 2024 रोज बुधवारला सकाळी 8 वा. महाराष्ट्र दिनानिमित्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला सलामी देवून राष्ट्रगान व महाराष्ट्र गीत गायनाने तसेच शाळेतील विद्यार्थीना खाऊ वाटप करीत महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला प्रभारी मुख्याधापक वांढरे मॅडम, सदस्य नामन पवार, शिवसेना चंद्रपुर वैद्यकीय जिल्हा प्रमुख तथा वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान, वाहतुक जिल्हा उपाध्यक्ष भारतभूषण झाडे, चंद्रपुर उप तालुका प्रमुख तथा वाहतुक तालुका सुरेश खापर्डे, शिक्षक नांदे सर,दर्वे सर, कातकर मॅडम, आदेवार मॅडम, अल्कोल्हीक अँनानिमस सदस्य,गावकरी नागरिक, पालक आणि शाळेतील विद्यार्थी मुले व मुली उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी मुले व मुलींनी तसेच शिक्षकांनी प्रयत्न केले.
Post a Comment