शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते यांचा भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागात जनसंपर्क दौरा

 शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते यांचा भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागात जनसंपर्क दौरा.


सन्माननीय किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांचे आदेशावरून श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी श्री कमलेश बारस्कर मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष मुंबई, श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा शहर प्रमुख भद्रावती, श्री कमलकांत कळसकर शिवसेना तालुकाप्रमुख भद्रावती, श्री सिंगल दीप पेंदाम उपतालुकाप्रमुख भद्रावती, यांचे समवेत भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागात दौरा करून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रात राबविलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती तळागाळातल्या शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, युवक, महिला व जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन भद्रावती तालुक्यातील बेलगाव विसापूर व घोसरी या गावांमध्ये जाऊन स्वतः विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली .

यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना, युवकांसाठी असलेल्या विविध योजना, बेरोजगारांसाठी असलेल्या विविध योजना, वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता कशाप्रकारे करावी व कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात, त्याचप्रमाणे महिलांसाठी असलेल्या अनेक योजना, आदिवासी प्रवर्गासाठी असलेल्या योजना, अशा विविध योजनांची माहिती श्री नितीन मते यांनी या तीनही गावातील नागरिकांना दिली व शिवसेना पक्षाच्या गावागावात शाखा तयार करून बूथ प्रतिनिधी व शाखाप्रमुखांची नियुक्ती केली यावेळी श्री मारुती वांढरे शाखाप्रमुख बेलगाव, प्रविण बांदूरकर शाखाप्रमुख विसापूर, भानूदास पेंदाम शाखाप्रमुख घोसरी तीनही गावातील असंख्य नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक प्रत्येक गावातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते*

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.