बल्लारपुर शहरातील प्रभाग क्र.1 न्यू कॉलोनीत 40 व्या वर्षी तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा..40th Tanha Pola is celebrated with great enthusiasm in Ward No.1 New Colony of Ballarpur city

बल्लारपुर शहरातील प्रभाग क्र.1 न्यू कॉलोनीत 40 व्या वर्षी तान्हा पोळा मोठ्या उत्साहात  साजरा

आयोजन समितीचे मुख्य संयोजक शिवसेना उपजिल्हा प्रमुख कमलेशभाऊ शुक्ला यांनी सहकार्याबद्दल मानले नगरवासियांचे आभार

    चंद्रपूर 
  बल्लारपुर :- शहरातील प्रभाग क्र.1 येथील न्यू कॉलोनीत तान्हा पोळा सन 1983 पासून करण्याची परंपरा अबाधित असून यंदा 40 व्या वर्षी देखील छोट्या-मोठ्या बालगोपालांनी, महिलांनी व पुरुष मंडळीनी सक्रिय सहभाग घेवून मोठ्या उत्साहात साजरा केला..

 मागील 39 वर्षापासून सदर तान्हा पोळ्याचे आयोजन समितीचे मुख्य संयोजक शिवसेना उपजिल्हा प्रमुख कमलेशभाऊ शुक्ला व त्यांच्या सहकारी मित्रमंडळी यांनी भगवा ध्वज ऊंच उभारून तान्हा पोळा सणाची सुरुवात केली असून ती वर्षोंनवर्षे अबाधित सुरु आहे.

  यंदा तान्हा पोळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, शिवसेना वैद्यकिय जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, बल्लारपुर शहर प्रमुख मनजीत मंगवा, राजुरा उपतालुका प्रमुख नबीखान पठाण,आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.