शिवसेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी चंद्रपुरचे पालकमंत्री मा. ना. डॉ. अशोकजी उइके यांचा सत्कार करुन शुभेच्छा..Shiv Sena, Chandrapur Guardian Minister Hon. no Dr. Congratulations to Ashokji Uike..

शिवसेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी चंद्रपुरचे पालकमंत्री मा. ना. डॉ. अशोकजी उइके यांचा सत्कार करुन शुभेच्छा..

चंद्रपुर जिल्हा :- 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. ना. डॉ. अशोकजी उइके यांची चंद्रपुर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ति झाल्याबद्दल त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून हार्दिक अभिनंदन करण्यात आले. 

तसेच प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देवून जिल्ह्यातील रखडलेली विकासकामे जलदगतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, महिला आघाडी चंद्रपुर जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम, वाहतुक चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा वैद्यकिय जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, भद्रावती माजी नगरसेवक नाना दुर्गे, योगेश म्यानेवार, विवेक दुर्गे, सविताताई टाले आदी शिवसैनिकांची उपस्थित होती .

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.