शिवसेना चंद्रपूर अल्पसंख्याक विभागाची कार्यकारिणी घोषित..Executive of Shiv Sena Chandrapur Minority Division announced

शिवसेना चंद्रपूर अल्पसंख्याक विभागाची कार्यकारिणी घोषित

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेची आज चंद्रपूर शहर व महानगर अल्पसंख्याक समाजाची कार्यकारिणी महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विभाग प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्या आदेशानुसार, जिल्हा प्रमुख बंडू हजारे, उप जिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला, चंद्रपूर तालूका प्रमुख संतोष पारखी यांच्या प्रमुख उपस्थितीत तर अल्पसंख्याक विभागाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख जमील शेख यांच्या नेतृत्वात घोषित करण्यात आली.

चंद्रपूर विश्रामगृहात आज दिनांक 25 जानेवारी 2024 शिवसेनेची अल्पसंख्याक विभागाची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी चंद्रपूर महानगर प्रमुखपदी ओबेद खान रुस्तम खान, उप महानगर प्रमुखपदी सोहेल गफ्फुर शेख, तालूका प्रमुख ताहीर इकबाल खान, उप तालूका प्रमुख सुरजित सिंग बावरे यांची नियुक्ती करण्यात आली.

दुर्गापूर वार्ड शाखा प्रमुख करन साखरे, भिवापूर शाखा प्रमुख साहिल जावेद शेख, नगीनाबाग शाखा प्रमुख मो. शरीफ शेख, घुटकाळा प्रमुख हसन सुबान कुरेशी, सिस्टर कॉलोनी प्रमुख सद्दाम अन्सारी, रहमत नगर प्रमुख फरहान रुस्तम खान, गोकुळ गल्ली, बाजार वार्ड प्रमुख शाहरुख उस्मान शेख, पठाणपुरा वार्ड प्रमुख इलियास शम्मी शेख, पंचशील वार्ड प्रमुख हर्षद बिरीया व रहमत नगर विभाग प्रमुख पदी इरफान शेख यांनी नियुक्ती करण्यात आली, यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे दुपट्टा, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

सदर कार्यकारिणी घोषणेच्या कार्यक्रमात वैद्यकीय जिल्हा प्रमुख अरविंद धीमान, दीपक कामतवार, बामणी ग्रामपंचायत चे सरपंच प्रल्हाद आलाम, नगरसेवक जिवती नगर पंचायत जमालुद्दिन शेख, शिवसेना बल्लारपूर उपतालूका प्रमुख संतोष श्रीरामे, चंद्रपूर उपतालूका प्रमुख अविनाश उके आदी असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.