उर्जानगरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..Ramlalla Pran Pratishtha ceremony celebrated in Urjanagar with great enthusiasm..
उर्जानगरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..
चद्रपुर :- उर्जानगर कोंडी वार्ड क्र. 5, पोलिस स्टेशन दुर्गापुर येथील एकदंत युवा मंडळाच्या वतीने अयोध्या येथील श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून श्री राम प्रतिमेची व हनुमानाची पूजा अर्चना, दीप प्रज्वलन, भजन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम करुन राम लल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नामदेवजी आसुटकर, संतोषभाऊ पारखी, शुभमभाऊ आंबेकर, मदनभाऊ चिवंडे, अक्षयभाऊ पवार, प्रवीणभाऊ गिलबिले यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकदंत युवा मंडळाचे अध्यक्ष नंदू मोंढे, उपाध्यक्ष निखिल भोयर, उपाध्यक्ष गणेश कोकडे, सचिव रोशन जीवतोडे, कोषाध्यक्ष रोहन बावणे, प्रमुख सदस्य आदित्य गिलबिले, वैभव दरेकर, सागर दडमल, रोहित तीतरे, तेजस खोब्रागडे, साहास कुळमेथे, आयुष गिलबिले, रोशन गिलबिले, जीवन बडगे, जागृत रामटेके, लोहित गिलबिले, गजानन सवळे, अभी कुळमेथे आणि आदर्श महिला बचत गटाच्या महिला यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment