चंद्रपूर, दुर्गापूर येथे एक आदमखोर बिबट जेरबंद .दोन बिबटाचा मुक्तसंचार ..Chandrapur Durgapur A man-eating leopard Jailed Two leopards freely walking
चंद्रपूर, दुर्गापूर येथे एक आदमखोर बिबट जेरबंद .
दोन बिबटाचा मुक्तसंचार
चंद्रपूर जिल्हा :- चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर वेकोली परिसरातील वसाहतीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आदमखोर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता अखेर यश आले आहे.
बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी त्सुनामी सारखी परिसरात पसरताच त्याला बघण्यासाठी परिसरातील सान,थोर,युवक, महिला पुरुषांनी तोबा गर्दी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची खबर दुर्गापूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार लता वाढीवे यांना कळताच त्यांनी वेळीच आपल्या सहकार्याना घेऊन घटनास्थळ गाठलं व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
कर्तव्यदक्ष या परिसरात यापूर्वी हिंसक(बिबटयाच्या ) वन्यप्रण्याच्या हल्यात अनेकांना आपापले जीव गमवावे लागले. प्रसंगी दुर्गापूर वासियांनी मोठमोठे आंदोलने देखील उभारले. राज्याच्या राज्यकर्त्यांना, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे अशा आदमखोर वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची कैफियत नगरवासियांनी मांडली आणि तशी योजना आखून त्यांचा बंदोबस्त करण्यात काही प्रमाणात वनखात्यातील त्या बहादरांना यश देखील आले. काही काळ शांत असलेल्या दुर्गापूरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले. आणि मागील आठवड्यात दोन आदमखोर बिबट्याचे मुक्तसंचार रात्रौ दरम्यान राहिवासी वसाहतीमध्ये सुरु झाले. एकामागेएक दोन दिवस सतत दोन पाळीव कुत्र्यांचा बळी या बिबट्यानी घेतला. येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मात्तब्बर युवकांनी वेळीच वनविभागाचे लक्ष वेधून या आदमखोर वन्यप्राण्याचा अविलंब बंदोबस्त करण्याची ताकीद दिली.
वनविभाने मागील चार दिवसापासून परिसरात पिंजरे लावून त्याचेवर पाळत ठेवून असतानाच आज त्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. काही प्रमाणात नगरवासियांनी सुटकेचा निःस्वास घेतला असला तरी पण " त्या " दोन बिबट्याची दहशत अजूनही येथील जनतेच्या मनात घर करून आहे. वनविभागानी त्या आदमखोर वन्यप्राण्याचे बंदोबस्त करावे अशी मागणी दुर्गापूर ऊर्जानगर वासियांनी केली आहे.
Post a Comment