चंद्रपूर रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाचे काम जलदगतीने करुन लीजची मुदतवाढ वाढवा.Deepening and beautification of Chandrapur Ramala lake and extend the lease term.

चंद्रपूर रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाचे काम जलदगतीने करुन लीजची मुदतवाढ वाढवा.

चंद्रपुर वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेचे सभापती बंडू हजारे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना मागणी.

चंद्रपूर जिल्हा:- येथील रामाळा तलाव हे महसूल विभागात येत वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्था मर्यादित,लि. चंद्रपूर, र.नं. १०४३ या संस्थेच्या कार्यक्षेत्रात येते असून कोविड-१९ (महामारी) पासून रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्याकरणाचे कामाकरीता दरवषी तलावातील पाणी बाहेर सोडून तलाव पूर्णपणे सुकविण्यात येते. परंतु रामाळा तलावाचे खोलीकरणाचे व सौंदयीकरणाचे काम अजुन अपूर्णच असल्यामुळे रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदयीकरणाचे काम जलदगतीने तात्काळ सुरु करुन तलावाची लिज मुदतवाढ करुन देण्यासंदर्भात चंद्रपुर वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेचे सभापती बंडू हजारे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली. यावेळी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदयीकरणाचे काम शासनाच्या दृष्टीने चांगले असले तरी वाल्मीकी मच्छुआ सहकारी संस्थेतील सभासदांचे आणि त्यांच्या कुटुंबियाचे फार मोठे आर्थिक नुकसान मागील तीन वर्षापासून सतत होत आहे. संस्थेतील सभासदांचे आणि त्यांच्या कुटूंबियांचे उदरनिर्वाह मासेमारी या व्यवसायावरच अवलंबून आहे.हा व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्यामुळे संस्थेतील सभासद बेरोजगार झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

आज पावेतो शासनाकडून कसल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. तलाव दरवर्षी सुकवित असल्यामुळे संस्था तलावात मत्स्यविज संचयन व संवर्धन करणे बंद केले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्यामुळे सर्व सभासद बेरोजगार झाले आहेत. रामाळा तलावाचे सभोवताल संरक्षण भिंतीचे व वाटर सिवेजट्रिटमेंट लॉन्ट आणि मुख्य कॅनल मधून पाणी लिकेज असल्याने त्याचे काम करुन संस्थेतील सभासदांना कामावर घेण्यात यावे व त्यांना रोजगार मिळवून देण्यात यावे. यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागेल.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.