बांग्लादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय यात्रा..Nyaya Yatra on behalf of the entire Hindu community against the oppression of the Hindu community in Bangladesh.
बांग्लादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय यात्रा..
चंद्रपुर जिल्हा :- जागतिक मानवाधिकार दिनाच्या दिवशी बांग्लादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात चंद्रपुर सकल हिंदू समाजाच्या वतीने दि. 10 डिसेंबर 2024 रोज मंगळवारला दू. 2:30 वा. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत न्याय यात्रा काढून बांगलादेशातील हिंदू, सिख, बौध्द, जैन, ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजावर इस्लामिक अतिरेक्यांनी मागील अनेक महिन्यापासून अत्याचार सुरु असून ज्यामध्ये हल्ले, हत्या, लुटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ, हिंदू आणि अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांची विटंबना सुरु केली आहे. या घटना रोखण्यासाठी योग्य ती पावेल उचलण्याऐवजी सद्याचे बांगलादेश सरकार व इतर संबधित यंत्रणा मूक प्रेक्षक बनून राहिल्या आहेत. या गंभीर प्रसंगी भारत सरकार व आंतरराष्ट्रीय संस्थांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून ते एकटे नसून संपूर्ण जग त्यांच्या पाठीशी आहे, हा भाव व्यक्त करण्याकरीता चंद्रपुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य न्याय यात्रा काढण्यात आली.
यावेळी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष व शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख मा. संतोष लिलाबाई दशरथ पारखी, शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे (वाहतुक) चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष चंद्रपुर जिल्हाप्रमुख मा. अरविंद विमला शामलाल धिमान, युवासेना चंद्रपुर महानगर प्रमुख मा. दिपक रेड्डी, वाहतुक चंद्रपुर उपतालुका प्रमुख विक्की महाजन तसेच असंख्य शिवसैनिकांचा देखील सदर न्याय यात्रेत सहभाग होता.
चंद्रपुर सकल हिंदू समाजाच्या प्रमुख मागण्या अशा की, बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराविरुद्ध तेथील सरकारला भारत सरकारकडून कठोर इशारा दिला जावा, मानवाधिकारवादी संघटनांनी हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकावरील हल्ल्याची, अत्याचाराची दखल घेऊन हा मुद्दा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरावा, बांगलादेशातील हिंदूंच्या जीविताचे आणि संपत्तीचे रक्षण तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घातला जावा, इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्णदास यांची तुरुंगातून तत्काळ स-सन्मान मुक्तता करण्यात यावी, हिंदू कलाकार, व्यावसायिक, उद्योगपती, खेळाडू, राजकीय नेते तसेच हिंदू मंदिरांना सुरक्षा पुरविली जावी, बांगलादेशातील पाकिस्तानी जिहाद्यांच्या हस्तक्षेपाला पायबंद घालावा, संयुक्त राष्ट्रसंघात हिंदू, बौद्ध, खिश्चन व अन्य अल्पसंख्यकांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला जावा, बांगलादेशातील अल्पसंख्य समाजाच्या रक्षणाची मागणी करणाऱ्या देशोदेशीच्या विविध आंदोलनांना सुरक्षा प्रदान केली जावी, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
Post a Comment