मंडळ अधिकारी व तलाठी ' एसीबी' च्या जाळ्यात, फेरफार करण्यासाठी घेतली 11 हजारांची लाच.
चंद्रपूर : फेरफार करन्याचा कामाकरीता 11 हजार रुपयांची लाच स्वीकारणारा तलाठी व तलाट्यास लाच घेण्यास अप्रेरणा देणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यास चंद्रपूर लालचुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंग मंगळवारी चिमूर तलाठी कार्यालयात रंगेहाथ अटक केली. राजू विठ्ठलराव रग्गड, तलाठी कार्यालय मसली व मंडळ अधिकारी चिमुर सुनिल महादेवराव चौधरी असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नावाने चिमूर तालुक्यातील मौजा आळेगाव [ देशमुख ] येथे गट क्र.273 मधे 2.84 हे , आर. चौ. मी. शेतजमीन आहै. तक्रारदार यांच्या आत्याचे सुद्धा त्या जमिनीवर नाव आहे. त्यांनी हक्क सोड पत्र बाबत दुय्यम निबंधक श्रेणी-1 , चिमूर या कार्यालयात नोंदणी केली. त्या शेतजमिनीवर तक्रारदार व त्यांचे भाउ यांची नावे जशीच्या तशीच ठेवून आत्याचे नाव कमी करून फेरफार करून देण्याचा कामाकरिता तक्रारदारांनी चिमूर तालुक्यातील म्हसली तलाठी कार्यालयात अर्ज केला. मात्र तलाठी राजु रग्गड यांनी नाव कमी करण्यासाठी15 हजारांची लाच मागितली.
चिमूर येथील तलाठी कार्यालयातच लाज स्वीकारताना रंगेहात अटक
तडजोडीने 11 हजार रुपयांत काम करून देण्याचे ठरल. मात्र तक्रारदारांना लाज देण्याची इच्छा नसल्याने त्यांना चंद्रपूर लाल प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सापळा रचून मंगळवारी चीमुर येथील तलाठी कार्यालयात लाज स्वीकारताना तलाठी राजू रग्गड यांना रंगीहात अटक केली तसेच ला स्वीकारण्यास अपरणा देणाऱ्या गोंदेडा सर्कलमधील मंडळ अधिकारी सुनील चौधरी यांना पण अटक करण्यात आली.
कारवाई ही चंद्रपूर लालच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षण प्रशांत पाटील, संदेश वाघमारे ,रोशन चांदेकर, वैभव गाडगे ,अमोल श्रीराम, राकेश जांभुळकर ,पुष्पा काचोडे ,सतीश सोडाम यांनी केली.
Post a Comment