बेवड्या मुलाने आपल्या आई आणि बायको वर कुऱ्हाडीने केला प्राणघात हल्ला .... चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील घटना
चंद्रपूर - मद्यधुंद मुलाने आपल्या आई आणि बायको वर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची भयानक घटना चिमूर तालुक्यातील पळसगाव पिपर्डा तेथे घडली आहे. पार्वता संभा मेश्राम व कल्पना मेश्राम अशी जखमीचे नावे आहे. हल्ल्यानंतर जंगलात पळालेली आरोपी मुलागा ला पोलिसांनी मोठ्या शिफारतीने अटक केली. अरविंद सभा मेश्राम असे आरोपी मुलाचे नाव आहे. जखमी आईला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे.
पळसगाव येथे अरविंद मेश्राम हा बुधवारी सकाळी दारू पण घरी आला आणि पत्नी कल्पनाही घरातली काम करत होती. त्यादरम्यान शिवीगाडी करून पतीने तिला मारहाण सुरू केली. सोनेच्या मदतीसाठी आई पार्वती मेश्राम आडवी आली असता त्यांनी दोघांवरही कुऱ्हाडीने हल्ला केला. या घटनेत पत्नीला किरकोळ तर आई गंभीर जखमी झाल्याचे पाहून आरोपी मुलगा जंगलात पळाला. त्यानंतर पत्नीने या घटनेची तक्रार पोलिसांना केली . पोलिसांनी जखमी आईला ताडतीने चिमु रुग्णालयात दाखल केली.
आरोपी जंगलात पडल्याची माहिती मिळते चंद्रपूर पोलिसांचे पथक सज्ज झाले. गुप्ती माहितीनुसार आरोपी विहीरगाव येथील बस स्थानक परिसरात असल्याचे माहित पडल्यास त्याला ताब्यात घेण्यात आले.
पर्वता मेश्राम यांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश चावरे ,विनोद जांबोडे, बीट अमलदार मेहरकुरे, पोलीस शिपाई भरत गोडवे, दगडू सरवते करत आहे.
Post a Comment