शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्षपदी (वाहतुक) भारतभूषण झाडे यांची नियुक्ती.Shiv Sena appointed Bharatbhushan Zade as Chandrapur District Vice President (Transport) of Indian Workers' Union!
शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्षपदी (वाहतुक) भारतभूषण झाडे यांची नियुक्ती!
कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व वाहतुक संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांच्या हस्ते नियुक्ति पत्र!
चंद्रपुर जिल्हा :- वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मणभाई जनार्दन तांडेल यांच्या आदेशानुसार शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व वाहतुक संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान यांनी चंद्रपुर येथे आज दि. 20 अप्रैल 2024 रोज शनिवारला चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे इथे वाहतूक कामगार वर्गाची फार मोठ्या प्रमाणात समस्या असल्याने शिवसेना भारतीय कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांनी कामगार संघटनेचा विस्तार करण्याच्या आदेशानुसार चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्षपदी (वाहतुक) भारतभूषण झाडे यांची नियुक्ति करुन वाहतुक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना महाराष्ट्र अध्यक्ष श्री. लक्ष्मण (भाई) जनार्दन तांडेल यांनी देवून नियुक्तीबद्दल अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर नियुक्ति करताना शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, वाहतुक संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान, चंद्रपुर तालुका अध्यक्ष सुरेश खापर्डे, चंद्रपुर तालुका उपाध्यक्ष विश्वास शेंडे, भद्रावती शहर अध्यक्ष मनोहर पतरंगे व शिवसेना चंद्रपुर वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख दिपक कामतवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Post a Comment