मूर्ती विमानतळाचा प्रस्ताव केंद्रीय वन सल्लागार समितीने नाकारला, वन मंत्री सुधीर मुनंटीवार यांना धक्का
चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विहिरगाव , मूर्ती गावात प्रस्तावित ' ग्रीनफिल्ड' विमानतळाचा प्रस्ताव केंद्रीय वन सल्लागार समितीने नगरला आहे.
विमानतळासाठी प्रस्थापित केली जागा ही वर प्राण्यांच्या अधिवासासाठी महत्त्वाची जागा असल्याचे कारण देत हा प्रस्ताव नकारून टाकल्याने राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
वन सल्लागार समिती हे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाची वैधानिक संस्था आहे. चंद्रपूर जल्ह्यातील प्रस्तावित विमानतळाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी समितीची 7 जुलै रोजी बेटा झाली. या बैठकीत समितीने विमानतळाचा हा प्रस्ताव नकारला. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधान्यकरणाच्या अधिकाऱ्यांनी समिती पुढे जोरदार प्रयत्न केले मात्र ,समितीने त्यांचा युक्तिवाद मान्य केला नाही. विमानतळासाठी प्रस्तावित केलेली जागा ही वन्य प्राण्यांच्या अधिवासासाठी महत्त्वाची जागा असून , येथे विमानतळ बांधल्यास मानवाचा हस्तक्षेप वाढेल, असे कारण समितीने दिले
या विमानतळामुळे परिसरातील वाघांच्या नैसर्गिक कॉरिडॉरला धोका निर्माण होऊ शकतो असे कारण देत समितीने अहवाल नकारला आहे.
Post a Comment